*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे ओरी आंबिवाडी प्रीमियर लीगचा थरार नुकताच अतिशय दिमाखात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला. हे केवळ क्रिकेटचे मैदान नव्हते, तर आपल्या सर्वांच्या उत्साहाचा एक मोठा उत्सव होता. वाडीत एकोपा, एकजूट आणि संघटन कसे उत्तम असते, याचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "आंबिवाडी प्रीमियर लीग" ठरली. सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकी खरोखरच कौतुकास्पद आहे.
सर्वच खेळाडूनी मैदानात दाखवलेले कौशल्य, खिलाडूवृत्ती आणि अटीतटीचा खेळ खरोखरच लाजवाब होता. यावेळी क्रिकेट प्रेमींचा उत्साहही ओसंडून वाहत होता
कारण प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय हा सोहळा अपूर्ण होता. ही लीग यशस्वी करण्यासाठी सर्व खेळाडूंनी APL साठी दिवस रात्र मेहनत घेऊन स्पर्धा शिस्तीत आणि सुंदररित्या पार पाडल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. या वर्षी विशेष आकर्षण होते ते म्हणजे आंबिवाडी प्रिमियर लिगचे गीत - शाहीर अनिल गराटे यांच्या काव्य कल्पनेतून आणि सुमधुर आवाजात संगीत बद्ध झालेले आंबिवाडी प्रिमियर गित सर्वांच्या मनामनात बसले
या स्पर्धे दरम्यान ओरी गावचे माजी सरपंच संकेत देसाई यांनी लिगला भेट देऊन सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्या दिल्या. शेवटी विद्यार्थी मित्रांना सुद्धा क्रिकेटचा धमाका आता संपला आहे. पुन्हा एका वर्षाने हीच प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी खेळाचा जोष मनात ठेवून आता पूर्णपणे आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि पुढील वर्षी येणाऱ्या परीक्षेत उत्तम यश मिळवावे अशा सदिच्छा देण्यात आल्या.



