*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या शहादा येथील शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ई.बी.सी.) मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची व्यवस्था पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते. पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत आपले प्रवेश अर्ज घेऊन जावे, असे आवाहन वसतिगृहाचे गृहप्रमुख प्रकाश सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे आहेत, प्रवेशासाठीच्या मुख्य अटी व पात्रता, उत्पन्न मर्यादा, पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹ 1 लाखापर्यंत असावे.
गुणवत्ता, विद्यार्थ्याला मागील इयत्तेत किमान 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
निवड पद्धत, ई.बी. सी. सवलत धारकांमधून गुणानुक्रमे (Merit) प्रवेश दिला जाईल.
अंतराची अट, विद्यार्थी शहादा शहरापासून किमान 15 किमी अंतरावरील रहिवासी असावा (स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाही). प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत, इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी: प्रवेश अर्ज घेऊन पूर्ण पुर्ततेसह सादर करण्याची अंतिम मुदत 10 जून 2026 पर्यंत आहे. इयत्ता 12 वी (कला, वाणिज्य व विज्ञान): निकाल लागल्यापासून 10 दिवसांच्या आत. इयत्ता 11 वी आणि महाविद्यालयीन सर्व शाखा: महाविद्यालयांचे निकाल लागल्यापासून 10 दिवसांच्या आत.
प्रवेशासाठीचे माहिती पत्रक व आदेश पत्र वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत मोफत मिळतील. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असेही वसतिगृहाचे गृहप्रमुख सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



