*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 19/05/2025 रोजी मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने आयोजित मॉकड्रिल / रंगीत तालीम आयोजित केलेबाबत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 19/05/2025 रोजी मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने आयोजित मॉकड्रिल / रंगीत तालीम आयोजित केलेबाबत*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 19/05/2025 रोजी मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने आयोजित मॉकड्रिल / रंगीत तालीम आयोजित केलेबाबत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दि. 19 मे 2026 रोजी मान्सुनपुर्व तयारीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार, पाणीपुरवठा विभाग, नंदुरबार, आरोग्य विभाग, नंदुरबार तसेच अग्निशमन दल, नंदुरबार अशा विभागांशी संयुक्तरित्या बैठक व मॉकड्रिलचे आयोजन 19 मे 2026 रोजी पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर प्रशिक्षण घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित विभागांनी त्यांच्या आस्थापनेवर समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास काय उपाय योजना कराव्यात मानवी आपत्ती उद्भवल्यास कोणत्या उपाय योजना करणे अपेक्षीत आहे. संभाव्य पूर परिस्थिती, अतिवृष्टी, झाडे पडणे, दरड कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते बंद होणे इत्यादी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री सज्ज ठेवण्यात याव्या याबाबत संबंधित विभागांना सुचित करण्यात आले. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग कसा करता येईल त्याबाबतचे प्रात्यक्षिक विरचक डॅम येथे प्रत्यक्ष दाखविण्यात आले.
त्यानंतर जिल्हा पोलीस दलाचे वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार, पाणीपुरवठा विभाग, नंदुरबार, आरोग्य विभाग, नंदुरबार तसेच अग्निशमन दल, नंदुरबार अशा विभागांशी संयुक्तरित्या मॉकड्रिलचे आयोजन साय. 17.30 वा. ते 19. 09 वा. पावेतो करण्यात आले होते. त्यात प्रथम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्ष, नंदुरबार येथील टोल फ्री क्र. 02564/210006 यावर कॉल करुन टोकर तलाव गाव येथील विरचक डॅम येथे 04 मुले पोहत असतांना त्यातील एक जण पाण्यात बुडत असलेबाबत कळविण्यात आले त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षाने लागलीच नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कॉलव्दारे कळविल्याने लागलीच मॉक ड्रिलमधील पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार तसेच संबंधित विभागाचे
अधिकारी/कर्मचारी असे घटनास्थळी तात्काळ रवाना करण्यात आले. त्यानंतर जलद प्रतिसाद पथकाने ईलेक्ट्रोक रेस्क्यु क्राफ्ट (ईलेक्ट्रीक नौका) व्दारे सदर पाण्यात बुडत असलेल्या इसमास पाण्याबाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथकाने सदर इसमावर प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिक दाखवुन पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे रुग्णवाहिकेने नेण्यात आले बाबतचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. सदर मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. सदर वेळी सर्व विभागाने तात्काळ प्रतिसाद दिला त्यावेळी सर्वांना मॉक ड्रिलचा महत्व व उद्देश्य समजावून सांगण्यात आले आहे. सदर वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे 12 पोलीस अधिकारी व 60 पोलीस अंमलदार तसेच वर नमुद विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून मान्सून काळात सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.



