*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
राजापूर(प्रतिनिधी):-शहरातील कोंढेतड भागाला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. नगरसेविका साजिया काझी - गिरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई- गोवा हायवे ते कोंढेतड पूल, कोंढेतड पूल ते पेणकर घर या दोन्ही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा रस्ता केवळ कोंढेतडवासियांसाठीच नसून उन्हाळे, हातिवले, जैतापूर, कोंडये, रेल्वे स्टेशन, जुवाठी, विखारे गोठणे, तारळ, डोंगर कणेरी, कुंभवडे, शेडे, दोनिवडे या गावांकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर कायमची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळकरी मुले, रुग्ण व जेष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर नगरसेविका साजिया काझी, मुजाहिद हनिफ काझी, अरविंद लांजेकर, मया रहाटे व अन्य नागरिकांच्या सह्या आहेत आता नगरपरिषद प्रशासन यावर काय कार्यवाही करते यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



