*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेबाबत लाडक्या बहीणींना आता अखेरची संधी देण्यात आलेली असल्याबाबत व e-KYC प्रक्रीयेत योग्य ती कागदपत्रे सादर करु न शकलेल्या लाडक्या बहीणींना जिल्हयाच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आलेली असल्याबाबत व ऑन लाईन e-KYC ऐवजी जिल्हा महिला विकास विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याची मुभा आता सरकारने दिलेली आहे, अशा आशयाची चुकीची बातमी सद्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसारीत होत आहे.
मात्र "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या e-KYC प्रक्रीयेत कागदपत्रे जिल्हयाच्या महिला व बाल विकास विभागात जमा करण्याची मुभा देण्यात आलेली असल्याबाबत कोणताही शासन निर्णय परिपत्रक शासनाकडून प्राप्त झालेले नाही. करीता प्रसार माध्यमांमध्ये e-KYC करणेबाबत जी चुकीची बातमी प्रसारीत होत आहे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये व e-KYC करणेसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय नंदुरबार येथे कागदपत्रे जमा करणेसाठी गदीं करु नये तसेच ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 अखेर योजनेची e-KYC केलेली नसेल अशा महिलांसाठी सद्यस्थितीत e-KYC करण्याची शासनाकडून कोणतीही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ज्या महिलांची यापूर्वीच e-KYC झालेली आहे अशा महिलांचे पैसे टप्या टप्याने शासनाकडून वितरीत करण्यात येत आहेत. तरी अशा महिलांनी त्यांच्या बैंक खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्याची खात्री करावी. ज्यांची e-KYC चुकलेली होती त्यांना 30 एप्रिल २ 2026 पर्यंत e-KYC सुधारण्याची संधी देण्यात आलेली होती अशा e-KYC सुधारणा केलेल्या महिलांनी देखील महिला बाल विकास कार्यालयात पडताळणी करणेकामी येण्याची आवश्यकता नाही.
तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या e-KYC करणेबाबत प्रसार माध्यमांवर प्रसारीत होत असलेल्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन संजय रा.पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केलेले आहे.



