*जागतिक मधमाशी दिन, पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक मधमाशी दिन, पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक*
*जागतिक मधमाशी दिन, पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. मानवापेक्षा मधमाशांचा इतिहास फार पुरातन आहे. 18 व्या शतकातील शास्रज्ञ अल्बर्ट आईनटाइन यांनी मधमाशीचे निसर्गातील महत् सांगताना असे म्हटले आहे कि या "पृथ्वीतलावरील मधमाश्या नामशेष झाल्यास मनुष्यजात चार वर्षापेक्षा जास्त काळ तग धरू शकणार नाहीं'. कारण मनुष्याचे अन्न निर्मितीचे काम परागीभवनाद्वारे मधमाशी करत असते हे बहुतेकांना माहीतच नाही. मधमाशीकडे पाहिल्यानंतर लक्ष्यात येते कि निसर्गाने तिला जणू परागीभवनासाठीच बनविले आहे. मधमाशी खाद्यासाठी सपुष्प वनस्पतींवर अवलंबून असतो. तर सपुष्प वनस्पती परागसिंचन व त्माद्वारे होणारे बीजधारणेसाठी मधमाशीवर अवलंबून असतात. जर परागसिंचन झाले नाही तर अनेक झाडे, झुडपे, वनस्पती नष्ट होऊ शकतात त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते. जंगलतोड, रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा बेसुमार वापर यामुळे मधमाशांची संख्या कमी झाल्याने परागसिंचना अभावी फळधारणा नीट न होणे, फळांचा आकार बिघडणे आणि एकंदरीतच उत्पादनात घट येणे अशा समस्यां दिसू लागल्या आहेत. त्यामुळे वेळीच मध माशीचे निसर्गातील महत्व लक्ष्यात घेऊन तिचे संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
असे असते मधमाशीचे पोळे: मधमाशींचे एक पोळे हे तिचे कुटुंब असून त्यात 15 ते 20 हजार माश्मा असतात. ज्यात एक राणीमाशी, 100 ते 200 नर आणि उरलेल्या सर्व कामकरी माशा असतात. राणीचं काम अंडी घालणं तर नराचे काम राणीशी संयोग करणे उरलेल्या कामकरी माशा मात्र वयानुसार मधवसाहतीतील सर्व कामे करतात. मधमाशीच्या वसाहतीत अनेक प्रकारची कामे चालतात यात राणीला खाऊ घालणे, छोट्या आणि मोठ्या अळ्यांना खाऊ घालणे, घरे बांधणे, वसाहतीचे संरक्षण करणे, साफसफाई करणे तर काही माशा इतर माशांना झालेल्या जखमा दुरुस्त करण्याचं काम करतात. कामकरी माश्यांचे एक महिन्याचे वय झाल्यानंतर मरेपर्यंत फक्त मध, मकरंद गोळा करण्याचं काम करतात. राणीमाशीचे आयुष्य 2 ते 3 वर्ष, नराचे आयुष्य 4 महिन्यापर्यंत तर कामकरी माशी 1 ते 6 महिन्यापर्यंत जीवन जगत असते. अशी ही वसाहत एका कुटुंबाप्रमाणे काम करते. मधमाशीच्या जाती,
जगभरामध्ये मधमाशांच्या अनेक प्रजाती असून भारतात मधमाशीपालन आणि परागीभवनासाठी पाच जाती प्रमुख आहेत. सातेरी माशी पश्चिम घाट आणि सातपुडा परिसरात या माशीचे वास्तव्य असतं आणि ही माशी एकास एक समांतर सात पोळे बांधते म्हणून तिला सातेरी माशी असं म्हणतात. मेलीफेरा माशीला इटालियन किंवा युरोपियन मधमाशी असे पण म्हणतात. कुठल्याही हवामानात समरस होण्याची क्षमता या माशीमध्ये असते. या माशीच वैशिष्ट्य म्हणजे यांचा स्वभाव मवाळ असतो आणि मध उत्पादन जास्त मिळते. आग्सा मधमाशी सर्वात मोठ्या आकाराची ही माशी असते. या जातीची वसाहत उंच झाडावर, इमारतीवर, उंच पाण्याच्या टाक्या, दऱ्याखोऱ्यामध्ये खडकावर असते. मधपोळे मोठ्या आकाराचे असते व यापासून मध भरपूर मिळते. परंतु ही माशी रागीट असल्याने तिला पेटीमध्ये पाळता येत नाही. या माशांचा चावा वेदनादायी असतो. कधी कधी जास्त प्रमाणात चावल्या तर जीवितहानीही होऊ शकते. फुलोरी माशी-आकाराने लहान असतात. त्याचे पोळे छोटे असतात. अडचणीच्या ठिकाणी वास्तव्य करतात. या माशीपासून मध उत्पादनही कमी मिळतं म्हणून पेटीत पाळत नाही. परंतु परागीभवनामध्ये ह्या जातीच्या माशा अत्यंत लाभदायी असतात. ट्रायगोना ही डंकहिन माशी असते. आकाराने खूप लहान असते परंतु यांच्या मधात औषधी गुणधर्म असतात. झाडाच्या ढोलीत या माशीचे वास्तव्य असते. यांच्या वसाहतीपासून 100 ग्रॅम पर्यंत मध मिळते. परागी भवनासाठी ही माशी उत्तम समजल्या जाते.
मधमाशीचे काही वैशिष्ट, मधमाशा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात किंवा शरीराचा विशिष्ट भाग एका विशिष्ट पद्धतीने हलवतात
राणीशी संयोग केल्यानंतर नर वसाहतीत काहीही काम करत नाहीत.
राणी माशी रोज 1000/1500 अंडी सलग 2/3 वर्ष घालत असते
एका तासाला मधमाश्या 10/20 किलोमीटर वेगाने हवेत उडतात. मधाचा रंग फुलाच्या रंगावर अवलंबून असतो. मध माशीची एक वसाहत वर्षाला 15/30 किलो मध गोळा करते. मधमाशी पालनातून मधासोबत मेण, पराग, विष. रोगण, रॉयलजेली इत्यादी पदार्थही मिळतात
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंद रबार मार्फत मधमाशी पालन या विषयाच्या जागृतीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जातात. यात ग्रामीण युवकांसाठी कौशल्प आधारित प्रशिक्षण, परागीभवनासाठी मधमाशीचे महत्य, संरक्षण, संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात वेलवर्गीय पिके ज्यात टरबूज, खरबूज, कारली खारखे पिके घेतले जातात ज्यांना परागीभवनासाठी मधमाशीची आवशकता असते. बरेच शेतकरी परागीभवनासाठी पिकात मधपेट्या ठेवतांना दिसतात. नंदुरबार जिल्ह्यात अजवान हे पिक दोन तालुक्यात घेतले जाते. अजवान पिकात परागीभवनासाठी मधपेट्या ठेवल्यास पिकाचे उत्पादन वाढून अजवाइनचे मध पण गोळा होते, ज्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कृषि विज्ञान केंद्रामार्फत मागील 5/6 वर्षापासून बाहेरील जिल्ह्यातील मधपाळांच्या पेट्या ठेऊन परागीभवनाद्वारे पिकाचे अधिक उत्पादन व मध उत्पादन घेण्याचे प्रात्यक्षिकही राबविले जात आहेत.



