*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोरचे उन्हामुळे धरणे आंदो
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोरचे उन्हामुळे धरणे आंदो
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोरचे उन्हामुळे धरणे आंदोलन तूर्त स्थगित*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोर दि.18 मे 2026 रोजी धरणे आंदोलन करण्याची नोटीस समन्वय समिती दिली होती. परंतु उन्हामुळे धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
असे असले तरी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त कार्यालयात जाऊन विजय क्षीरसागर यांना निवेदन देत सविस्तर चर्चा केली. आपल्या आंदोलनाच्या परिणामी दोन दिवसांपूर्वी राज्य हिस्सा मानधन जमा झाले असून केंद्र हिस्सा मानधन आज संध्याकाळपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्तालयातील वित्त व लेखा विभागाचे सहा. आयुक्त सोमिनाथ काकडे यांनी दिली. समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे थकीत मानधनाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
शिष्टमंडळात युवराज बैसाने, संजय मापले, रामकृष्ण बी. पाटील, आशा जाधव, अमोल बैसाने यांनी भागीदारी केली.



