*अंगणवाडी सेविकेचा राज्यभर गौरव, बबिता पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंगणवाडी सेविकेचा राज्यभर गौरव, बबिता पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” प्रदान*
*अंगणवाडी सेविकेचा राज्यभर गौरव, बबिता पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” प्रदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अंगणवाडीच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या पाडवी यांनी राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावून 2026 मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच जिल्हास्तरावर सलग पाच वर्ष प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी विक्रमी कामगिरी केली आहे. “पोषण पे चर्चा”, “पोषण भी पढाई भी”, “आपल्या बालकाचं उज्वल भविष्य”, “बालकांच्या सहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती”, तसेच “किलबिल्यांचे गमती-जमती” यांसारखे उपक्रम त्यांच्या कार्याची खास ओळख ठरले आहेत. सध्या “खेळातून शिका” या अभिनव संकल्पनेवर भर देत त्या शिक्षण अधिक आनंददायी बनवत आहेत. कोरोना काळात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम करत त्यांनी समाजाला सजग ठेवण्याचे कार्य केले. निराधार महिला, कुपोषित बालके, किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा माता तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
किशोरवयीन मुलींसाठी मासिक बैठका घेऊन वैयक्तिक स्वच्छता, शारीरिक व मानसिक आरोग्य, त्वचेची काळजी, तसेच पोस्को ॲक्ट विषयी माहिती दिली जाते. बालविवाहासंदर्भात मार्गदर्शन करून समाजजागृतीचे कार्यही सातत्याने सुरू आहे. या पुरस्कार सोहळ्यास मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), मृणाल कुलकर्णी, नितीश घारे तसेच डॉ. बी. एन. खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती बबिता पाडवी यांचे कार्य हे केवळ अंगणवाडीपुरते मर्यादित न राहता समाज परिवर्तनाचा एक आदर्श ठरत असून, त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.



