*20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता, नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता, नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन*
*20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता, नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील बहुतांश खाजगी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आपली नित्यनियमाची व अत्यावश्यक औषधे तसेच वैद्यकीय साहित्य आगाऊ खरेदी करून ठेवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (औषधे) सु.सा. देशमुख यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. पर्यायी व्यवस्था व आपत्कालीन सेवा सुरू राहणार, बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयांमधील औषध साठा आणि काही निवडक औषध दुकाने तसेच आपत्कालीन सेवा सुरू राहतील. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे.
केमिस्ट बांधवांना संपामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन,
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) यांनी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांना या संपामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. औषधे हा ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ अंतर्गत मोडत असल्याने रुग्णांना औषध न पुरवणे किंवा नकार देणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते. तसेच, औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत मंजूर परवान्यांचा मुख्य उद्देश रुग्णांना औषधे वेळेवर मिळवून देणे हाच आहे. संपामुळे रुग्णांना वेठीस धरणे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण करणे जनहिताच्या दृष्टीने योग्य नाही, अशी जाणीव प्रशासनाने करून दिली आहे. जर संप काळात औषधांअभावी रुग्णांना त्रास झाला, तर संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संपाच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सु. सा. देशमुख, सहाय्यक आयुक्त, (औषधे) भ्रमणध्वनी: 9850177853 व सोमनाथ मुळे, औषध निरीक्षक, भ्रमणध्वनी: 9404426233 कार्यालयीन फोन: 02564-299053 यांच्याशी संपर्क साधावा, असेही देशमुख यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



