*ओणी गोरुलेवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धेत साईराज तेलीवाडी संघाचा द्वितीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी गोरुलेवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धेत साईराज तेलीवाडी संघाचा द्वितीय क्रमांक*
*ओणी गोरुलेवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धेत साईराज तेलीवाडी संघाचा द्वितीय क्रमांक*
ओणी(प्रतिनिधी):-श्री जांगलदेव मंदिर जीर्णोद्धार निमित्ताने आदर्श गोरुलेवाडी ओणी यांच्या वतीने भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये साईराज तेलीवाडी क्रिकेट संघ (ओझर) या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. या शानदार यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, समर्थकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. या स्पर्धेतील ट्रॉफी वितरण समारंभ मुंबई रणजी संघाचे कर्णधार खेळाडू सिद्धेश लाड यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांनी आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रेरणा दिली, या स्पर्धेत साईराज तेलीवाडी क्रिकेट संघाच्या वैभव पावसकर यांने उत्कृष्ट गोलंदाज तर कु. राम कुर्ले यांने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे बक्षीस पटकावले
या सामन्यात विशाल बंदरकर, चेतन पावसकर, अजय कुर्ले यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला तसेच इतर सर्व खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाने स्पर्धेत रंगत आणली. त्यांच्या मेहनत व संघभावनेचे विशेष कौतुक होत असून
साईराज तेलीवाडी क्रिकेट टीमच्या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी यावेळी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



