*जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष: शिळ येथील रस्ते कामात ठेकेदाराची 'मनमानी'*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष: शिळ येथील रस्ते कामात ठेकेदाराची 'मनमानी'*
*जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष:शिळ येथील रस्ते कामात ठेकेदाराची 'मनमानी'*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील शिळ येथील मारुती मंदिर ते शिवसेना शाखा या 700 मीटर रस्त्याच्या कामात केवळ दर्जाचाच प्रश्न निर्माण झाला नसून, संबंधित विभागाच्या अनुपस्थितीमुळे ठेकेदाराचे फावले असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून काम सुरू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे ठेकेदार आपल्या मर्जीने आणि मनमानी पद्धतीने काम उरकत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकारी गायब, ठेकेदार सुसाट! शासकीय नियमानुसार कोणतेही सार्वजनिक काम सुरू असताना संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंता किंवा देखरेख अधिकाऱ्याची उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, शिळ येथील या कामाच्या ठिकाणी 'राम भरोसे' कारभार सुरू आहे. अधिकारी फिरकत नसल्याचा फायदा घेत ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असून, ग्रामस्थांच्या प्रश्नांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या व तक्रारी प्रत्यक्ष पाहणीची मागणी संबंधित विभागाने तात्काळ कामाच्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी (Site Inspection) करावी. कामाचा दर्जा तपासावा वापरले जाणारे डांबर आणि रस्त्याची जाडी यांची तांत्रिक तपासणी व्हावी. मर्जीने काम थांबवावे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मर्जीने सुरू असलेले हे घाईगडबडीचे काम थांबवून ते निकषांनुसार पूर्ण करून घ्यावे. दहा लाख रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होणे, हे संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांच्या अभयामुळेच ठेकेदार निकृष्ट काम करण्याचे धाडस करत आहेत का? असा प्रश्न आता शिळवासीय विचारत आहेत. जर तातडीने दर्जा सुधारला नाही, तर या कामाला स्थगिती देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.



