*मासू गावातील ओमकार मित्र मंडळ व सरस्वती महिला मंडळ, मास्कर गुरववाडी यांच्यातर्फे माहेरवाशिणींचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मासू गावातील ओमकार मित्र मंडळ व सरस्वती महिला मंडळ, मास्कर गुरववाडी यांच्यातर्फे माहेरवाशिणींचा सन्मान*
*मासू गावातील ओमकार मित्र मंडळ व सरस्वती महिला मंडळ, मास्कर गुरववाडी यांच्यातर्फे माहेरवाशिणींचा सन्मान*
गुहागर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे मासू गावातील मास्कर गुरववाडी तेथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजा बुधवार दि.6 मे 2026 आयोजित करण्यात आली होती या दिवशी "सन्मान माहेरच्या नात्याचा" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता. वाडीतील 23 माहेरवाशीणींचा सन्मान करण्यात आला. सन्मान करताना विवाहित स्त्रीसाठी माहेर हे पंढरीसारखे पवित्र मानले जाते. सण, वार किंवा सुख-दुःखाच्या प्रसंगी माहेरच्या माणसांची आठवण आणि त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. माहेर' आणि 'सन्मान' या दोन शब्दांचा संबंध मराठी संस्कृतीत खूप भावनिक आणि अतूट आहे. माहेर हे केवळ एक घर नसते, तर तो मायेचा आधार, हक्काचे स्थान आणि लहानपणीच्या आठवणींचा ठेवा असतो. माहेरच्या नात्याचा सन्मान म्हणजे केवळ सणावारी भेटणे नाही, तर परस्परांमधील आपुलकी, समजदारपणा आणि संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणे होय.
माहेरची ओढ तसूभरही कमी होत नाही, त्यामुळे काळानुरूप नात्यात बदलाची गरज आहे. माहेराने लेकीला परके न करता तिचे स्वागत करणे, आणि लेकीनेही सासरी रमून माहेरचा सन्मान जपला पाहिजे. सन्मान माहेरच्या नात्याचा हा उपक्रम राबवत असताना ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचे आर्थिक सहकार्य केले त्या सर्व देणगीदाराचे मनापासून आभार.
आपल्या या योगदानामुळेच "सन्मान माहेरच्या नात्याचा" हा उपक्रम यशस्वी आणि उत्सहात पार पडला. माहेरवाशीणींचा सन्मान म्हणून सन्मान पूर्वक माहेरची साडी, सन्मान चिन्ह, श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन माहेरवाशीणींना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला गुहागर तालुका माजी आमदार डॉ. विनय नातु, जि. प. सदस्य नेत्राताई ठाकुर, गुहागर तालुका उपसभापती निलेश सुर्वे, उद्योजक लक्ष्मण शिगवण, सचिन ओक, जगन्नाथ शिंदे, प्रमोद घुमे, संतोष घुमे, शांताराम शिंदे, विजय मसुरकर, पाडुरंग नाचरे, मंगेश मास्कर, शेखर आलिम,भाई मसुरकर, दत्ताराम मास्कर, महादेव नाचरे आदी मान्यवर उपस्थीत होते. आपले सहकार्य हेच आमचे बळ आहे भविष्यातही आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभत राहो अशी प्रार्थना यावेळी ईश्वरचरणी करण्यात आली.



