*सडे मानेवाडी येथे बालवीर प्रगती मंडळ व वीर जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सडे मानेवाडी येथे बालवीर प्रगती मंडळ व वीर जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम संपन्न*
*सडे मानेवाडी येथे बालवीर प्रगती मंडळ व वीर जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम संपन्न*
मंडणगड(प्रतिनिधी):-तालुक्यातील मु. सडे - मानेवाडी येथे बालवीर प्रगती मंडळ व वीर जिजामाता महिला मंडळ, मानेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत. सडे- मानेवाडी येथे ग्रामस्थांच्या स्वखर्चाने पंधरा पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन सडे गावचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नथुराम सोनघरे यांच्या शुभहस्ते व सुरेश जाधव, माजी मंडल अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकिशोर माने, प्रकाश माने, चंद्रकांत माने, रमेश पार्टे, श्रीमती सुलोचना सोनघरे, सौ. प्रीती सोनघरे व ग्रामपंचायत सदस्या सौ. वनीता माने आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला वाडीतील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी कु आर्या माने हिने संस्कृत मधून तर सुलोचना सोनघरे, महिला मंडळाच्या सचिव प्रीती सोनघरे, आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त दीप्ती जाधव, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र माने व नथुराम सोनघरे आदींनी गावाच्या विकास कामांबाबत मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. दिनेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत सोनघरे यांनी केले. स्थळ पूजन, महिलांचा सुस्वर हरिपाठ, महाप्रसाद, महिला व पुरुष मंडळी यांची संवाद बैठक, महिला व पुरुष यांनी लेझीम नृत्य व दिंडी, बाल कलाकारांचे नृत्य अविष्कार व ह. भ. प. दिलीप माने यांचे ग्रामस्थांसह सुस्वर भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री राजेंद्र माने, प्रसाद सोनघरे, अनंत माने, विश्वास माने, विरेंद्र माने, संतोष माने, कुलदीप सोनघरे, ओंकार माने, मनोज महाडिक आदी कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला होता.



