*8मे रोजी श्री क्षेत्र टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*8मे रोजी श्री क्षेत्र टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
*8मे रोजी श्री क्षेत्र टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 8 में 2026 रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे 500 वर्षापूर्वी सन 1510 ते 1512 या काळात टेरव येथे करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन 1839 साली सदर मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर या जुन्या लाकडी कौलारु मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करुन दिनांक 8 मे 2011 रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर, यांचे शुभहस्ते आणि ह.भ.प. भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर मंदिर स्थापत्यशास्त्राच्या कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना असून, आई भवानी वाघजाई मातेचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभते.
15 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, नवचंडी हवन, महिलांसाठी संस्कृतिक कार्यक्रम व हळदी कुंकू समारंभ, दुपारी महाआरती, महाप्रसाद व संध्याकाळी राधाकृष्णवाडी भजन मंडळाचे सुस्वर भजन, महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापनदिनी श्रीमती मीनाक्षी तळेवाडी, टेरव यांनी पती कै. मनोहरराव गणपतराव कदम यांच्या स्मरणार्थ चांदीचा ₹.17007 किमतीचा दिवा कुलस्वामिनी श्री भवानी माते चरणी अर्पण केला. महाराष्ट्र शासनाने सदर देवस्थानास पर्यटनाचा क दर्जा तसेच तीर्थ क्षेत्राचा ब दर्जा बहाल केला आहे. कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे भव्यदिव्य मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी रस्ता, भव्य मंदिर, भैरी भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी आणि नवदूर्गांसह इतर देवतांच्या आकर्ष मूर्ती, प्रशस्त उद्यान आणि देवरहाटीतील गारवा यामुळे या ठिकाणी पर्यटक आकर्षित होत आहेत. श्री क्षेत्र टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई मंदिर हे धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.
वर्धापनदिनी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल भाविक, पर्यटक, ग्रामस्थ यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले आहेत.



