*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यात ग्रामीण भागात असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर ओझर या प्रशालेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे माहे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत या शाळेचा निकाल याही वर्षी शंभर टक्के लागला आहे उच्च श्रेणी म्हणजेच 75 टक्के च्या वरती सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच प्रथम श्रेणीमध्ये म्हणजेच 60% वरती सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले द्वितीय श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे कुमारी पूर्वा पांडुरंग पळसमकर हिला 83.40% गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे तसेच कुमार सोहम संतोष गीते या विद्यार्थ्याला 81.60 टक्के गुण मिळाले असून त्याचा द्वितीय क्रमांक आला आहे तसेच कुमारी तहूरा अल्लाउद्दीन हसोलकर हि 70.60 % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे मुख्याध्यापक मुरलीधर खानविलकर यांनी मराठी हिंदी व समाजशास्त्र तसेच चंद्रकांत रघुनाथ पाटील यांनी इंग्रजी विषयाचे तर सौभाग्यवती सौ पूनम कांबळे यांनी विज्ञानाची विषयाचे त्याचप्रमाणे सुतार यांनी गणित विषयाचे मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम राखल्यामुळे ओझर पंचक्रोशी विद्यावर्धिनी ओझर संस्था पालक वर्ग यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



