*शिरोडा–वेंगुर्ला–बोरीवली एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिरोडा–वेंगुर्ला–बोरीवली एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*शिरोडा–वेंगुर्ला–बोरीवली एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन*
वेंगुर्ले(प्रतिनिधी):-तालुक्यातील पंचक्रोशीतील गावांची तथा प्रवाशांची मागणीची दखल घेत एसटी महामंडळाकडून शिरोडा-बोरीवली बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. सदर गाडी शिरोडा वरून संध्याकाळी 4.30 वाजता आणि बोरीवली वरून संध्याकाळी 7 वाजता सोडण्यात येत आहे. सदर गाडी वेंगुर्ला, मठ हायस्कूल, वेतोरे तिठा, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कसाल, कणकवली, तळेरे, खारेपाटण, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, पनवेल, कोकणभवन, वाशी, मैत्रीपार्क, सायन, खार, विलेपार्ले, संमता नगर मार्गे जाते. महिला सन्मान योजने अंतर्गत सर्व महिला प्रवाशांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिक (75 वर्षांवरील) यांना मोफत प्रवास व जेष्ठ नागरिक (65 वर्षांवरील) यांना तिकीट भाड्यात 50% सवलत देण्यात येते. प्रवाशांनी सदर सेवाचा लाभ घ्यावा असे आव्हान कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे संचालक तथा अध्यक्ष अपेक्षित कुळये व सदस्य स्वप्नील परब यांच्याकडून करण्यात येत आहे.



