ताजा खबरे:
*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
*शिरोडा–वेंगुर्ला–बोरीवली एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा, मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश, जिल्हा परिषद नंदुरबारचा सुधारित परिपत्रक जारी; सुमारे 3 हजार शिक्षकांना ल
*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त “ज्ञानियांचा राजा” विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जतन करत अभंग, भजन आणि प
*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा, मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश, जिल्हा परिषद नंदुरबारचा सुधारित परिपत्रक जारी; सुमारे 3 हजार शिक्षकांना ल

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा, मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश, जिल्हा परिषद नंदुरबारचा सुधारित परिपत्रक जारी; सुमारे 3 हजार शिक्षकांना ल

  • Share:

*पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा, मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश, जिल्हा परिषद नंदुरबारचा सुधारित परिपत्रक जारी; सुमारे 3 हजार शिक्षकांना लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पेसा अर्थात आदिवासी क्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत एस-14 वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सुधारित परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी 11 मे 2026 रोजी हा आदेश निर्गमित केला. राज्य शासनाच्या विविध निर्णय, शासन परिपत्रके तसेच महाराष्ट्र उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशांचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 15 एप्रिल 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत लाभ देण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र प्राथमिक शिक्षकांना नेमकी कोणती वेतनश्रेणी लागू होणार याबाबत संभ्रम कायम होता.
सुधारित परिपत्रकानुसार, सेवाप्रवेश नियमांमध्ये प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पद हे पदोन्नतीचे पद उपलब्ध असल्याने, आदिवासी क्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर पदोन्नती योजनेत मुख्याध्यापक पदाच्या वेतनश्रेणीप्रमाणे एस-14 वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी लागू असलेल्या एस-13 वेतनश्रेणीऐवजी शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित शिक्षकांची वेतननिश्चिती एकस्तर योजनेनुसार करण्यात यावी. तसेच भविष्यात शासनस्तरावर काही वसुली निश्चित झाल्यास ती संबंधित शिक्षकांकडून एकरकमी वसूल करण्यात येईल. यासाठी शिक्षकांकडून हमीपत्र घेऊन त्याची नोंद दप्तरी ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव पंचायत समिती क्षेत्रातील आदिवासी भागात कार्यरत सुमारे तीन हजार प्राथमिक शिक्षकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. मध्यवर्ती शिक्षक संघटनांनी दीर्घकाळ केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने नंदुरबार जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी  भानुदास रोकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण, श्रीमती वंदना वळवी, प्राथमिक शिक्षण आस्थापनेतील प्रशासन अधिकारी कनिष्ठ, वरिष्ठ प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश गावित यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित पदाधिकारी भरत सावंत, गोपाल गावित, संजय वळवी, वसंत सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, हेमंत सूर्यवंशी, प्रदीप अहिरे, सतिश पाटील, संजय बाविस्कर, प्रवीण देवरे, अशोक देसले, फुलसिंग वसावे, जगदीश नाईक, निदेश वळवी, आबा बच्छाव, दादा पिंपळे, प्रकाश बोरसे, संजय गावित, विश्वास देसाई, भगवान सोनवणे, महेंद्र बैसाणे, परमेश्वर मोरे, कमल पावरा, जितेंद्र बोरसे, अनिल सोनवणे, पंकज भदाणे, गोकुळदास बेडसे, सुनील नहिरे, भटू बंजारा, अनिल गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
May, 12 2026
*शिरोडा–वेंगुर्ला–बोरीवली एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन*
May, 12 2026
*पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना एस-14 वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा, मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश, जिल्हा परिषद नंदुरबारचा सुधारित परिपत्रक जारी; सुमारे 3 हजार शिक्षकांना ल
May, 12 2026
*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त “ज्ञानियांचा राजा” विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जतन करत अभंग, भजन आणि प
May, 12 2026
*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*
May, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज