*लाच देणे-घेणे गंभीर गुन्हा,सीबीआयची नंदुरबारपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाच देणे-घेणे गंभीर गुन्हा,सीबीआयची नंदुरबारपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू*
*लाच देणे-घेणे गंभीर गुन्हा,सीबीआयची नंदुरबारपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शासकीय कार्यालयांमध्ये काम करून घेण्यासाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, लाच देणे व घेणे हा गंभीर फौजदारी गुन्हा असल्याची जनजागृती करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) व लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, पुणे कार्यालयाच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. सीबीआयचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आर.एन. प्रसाद व पोलीस उपअधीक्षक आर. के. जोशी यांनी सोमवारी शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. यावेळी लाचखोरी संदर्भातील कायदे, तक्रार प्रक्रिया तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शासकीय कार्यालये, केंद्र व राज्य शासन विभाग, राष्ट्रीयकृत बँका तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी थेट सीबीआयकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी 9175022250 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस विविध ठिकाणी बैठका, संवाद कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. व्यापाऱ्यांच्या बैठकीला व्यापारी बाजार समिती संचालक गिरीश जैन, किशोर वाणी, संजय अग्रवाल, मनीष अग्रवाल, ओम खंडेलवाल, अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, वीरेंद्र वाणी, शुभम अग्रवाल, गौरव अग्रवाल, कौशल महेश्वरी, कृष्णा अग्रवाल आणि मनीष लुणावत उपस्थित होते. पुणे विभागांतर्गत एकूण 18 जिल्ह्यांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून त्यात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आर.एन. प्रसाद यांनी सांगितले.



