*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (एसएससी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने यावर्षी शंभर टक्के यश संपादन केले आहे. परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या परीक्षेत कु. राजनंदनी छगन पाडवी हिने 81.80 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक दीपक गणपत पावरा (80.60%) याने मिळवला, तर
तृतीय क्रमांक विद्या धनसिंग राहसे (78.80%) हिने संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, संस्थेच्या सचिव ऋषिका गावित, विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील, तसेच शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने राबवले जातात, असे मत पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



