*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविका संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने 2024-25 या शैक्षणिक वर्षातील कै.आकाश त्र्यंबक पाटील या विद्यार्थ्याचा आकस्मित मृत्यू झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून विमा कंपनीकडून पाच लाखाच्या विम्याचा धनादेशाचे वाटप ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष पी.बी. पटेल यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव बी.व्ही. चौधरी, माजी प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील, माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.बी. चौधरी तसेच कै. आकाश त्र्यंबक पाटील या विद्यार्थ्याचे वडील त्र्यंबक गोविंद पाटील तसेच आई, भाऊ, वहिनी आणि बोराळे गावाचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पाच लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले. यावेळी त्रिंबक गोविंदराव पाटील यांनी महाविद्यालयास 50,000 हजार रुपयाची देणगी जाहीर केली. आशिष त्र्यंबक पाटील यांनी संस्थेचे, महाविद्यालयाचे व विद्यार्थी विकास विभागाने केलेल्या पाठपुरावाचे कौतुक केले. माजी प्राचार्य एस.पी. पाटील यांनीही याप्रसंगी मान्यवरांचे कौतुक करून महाविद्यालयात चालणाऱ्या विविध योजना संबंधी मान्यवरांच्या समोर इतिवृत्तांत कथन केला. आभार प्रगटन डॉ.सी.एस. करंके यांनी केले.



