*खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा-हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा-हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
*खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा-हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथून पुणे, मुबंईसह अनेक लांबचा महानगरसाठी खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स दररोज धावत असतात. उन्हाळ्याचा सुट्ट्यांच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्स चालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहे. उन्हाळी सुटीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स चालक तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. सुट्ट्यांच्या व सणासुदीला काळात नेहमीच प्रवाश्यांची आर्थिक लूट होत असते. प्रवाश्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर परिवहन विभागाने कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने निवेदनाद्वारे दिला. मागण्यांचे निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये प्रवाशांची खाजगी बसेसकडून होणारी लुटमार थांबविण्यासाठी अध्यादेश काढला होता. सरकारी बसभाड्याच्या फक्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा शासनाने खाजगी ट्रॅव्हल्सना दिली होती. मात्र, सरकारच्या परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून प्रवाशांची लूट बिनबोभाटपणे सुरू आहे. निवेदनात मागण्यांमध्ये म्हटले आहे की, खाजगी ट्रॅव्हल्सना एसटी बसचा साध्या बसच्या भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याची मुभा आहे. त्याप्रमाणे ट्रॅव्हल्स चालक यांनी भाडे आकारणी करावी.
खाजगी ट्रॅव्हल्स चालक दीडपटीपेक्षा जास्त भाडे आकारत असतील, तर प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
सर्व खाजगी लक्झरी बस बुकिंग ठिकाणी व वाहनतळाच्या ठिकाणी एसटी बस आणि खाजगी बसच्या भाड्याच्या तुलनात्मक दरपत्रक लावणे बंधनकारक आहे, असे दरपत्रक नंदुरबार येथे कुठेही दिसून येत नाही, तरी सर्व खाजगी लक्झरी बस यांना दरपत्रक लावणे बंधनकारक करावे तसे न करणाऱ्यांवर कारवाई करावी.
नंदुरबार आरटीओ विभागाने प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक (हेल्पलाईन नंबर) जारी करावा, जेणेकरून प्रवाश्यांना तक्रार करता येईल. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, चेतन राजपूत, ऍड भारती कासार,जॉली शाह, राजू चौधरी, नम्रता परदेशी, डॉ ध्वनी शाह आदी उपस्थित होते.



