*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन विसरवाडी पोलीसांच्या ताब्यात,तब्बल 13 लाख 3 हजार 60 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन विसरवाडी पोलीसांच्या ताब्यात,तब्बल 13 लाख 3 हजार 60 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन विसरवाडी पोलीसांच्या ताब्यात,तब्बल 13 लाख 3 हजार 60 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 6 मे 2026 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खांडबारा ते शेही रोडदरम्यान खांडबारा गावाकडून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा वाहनात देशी दारु व बिअर बॉटल असे भरुन विनापास परमिटशिवाय सदर रोडवरुन गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जाणार आहेत, बाबत खात्रिशीर माहिती मिळाल्यावरुन जयेश खलाणे हे स्वतः त्यांच्या पथकासह बातमीची खात्री करुन कारवाई करणे कामी रवाना झाले. मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे खलाणे व पथक असे पंचासह खांडबारा ते शही रोडाचे दरम्यान एका शेतासमोर रोडाचे बाजुला सापळा रचुन उभे असतांना काही वेळानंतर खांडबारा गावाकडुन एक पांढऱ्या रंगाचे क्रेटा वाहन येतांना दिसले. सदर वाहनास हात देऊन थांबण्यासाठी इशारा केला असता वाहनावरील चालक याने वाहन थोड्या अंतरावर थांबवुन चालक व त्याचे सोबत असलेल्या इसमाने शेतातुन पळ काढला. सदर वाहनाजवळ येत पथकाने तपासणी करता वाहनाची नंबर प्लेट वरील क्रमांक हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले, तसेच वाहनाचे चेसिस क्रमांकावरुन वाहनाचे मालकाची माहिती घेण्यात आली, सदर वाहनाची पथकाने तपासणी केले असता त्यामध्ये एकूण 13 लाख 06 हजार 060 रुपये किमतीचे देशी दारु, बिअर व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन एकुण तिन इसमांविरुध्द विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 196/2026 भा. न्या. संहिता कलम 318 (4) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई),83, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश खलाणे, पोहेका राजु कोकणी, पोकों/सागर चौधरी, शाम पेंढारे, लिनेश पाडवी, प्रकार अहिरे, दिनेश पावरा यांनी केली आहे.



