*कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र यावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र यावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
*कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र यावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र यावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
मान्यवराच्या हस्ते द्विप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हातर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आत्मा विभाग, नंदुरबार यांच्या सहयोगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राची (BRC) उभारणी करण्यात येत आहे या अनुषगाने तिथे प्रत्यक्षात काम करणारे अधिकारी वर्ग व प्रमुख शेतकरी यांच्या सहभागाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जेणे करून आपापल्या बीआरसी केंद्राची उभाराणी करता येईल, या प्रशिक्षणात विविध मान्यवराची उपस्थिती लाभली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख श्री राजेंद्र दहातोंडे, बायफ संस्थेचे कार्यक्रम समन्वयक, देवेंद्र पाटील, शेतकरी प्रतिनिधी म्हणून लाभलेले नैसर्गिक शेतीचे उत्पादक गणेश गोविंद पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविकता राजेंद्र दहातोंडे करत असताना नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, यासाठीचे सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहे, जमिनीचे आरोग्य व गुणवत्तापूर्वक उत्पादन हे महत्त्वाचे असून यावर नैसर्गिक शेती भविष्यात कशी फायद्याची आहे याचे महत्त्व पटवून दिले, तांत्रिक मार्गदर्शनात देवेंद्र पाटील यांनी टेन ड्रम थेरी कशा पद्धतीने असली पाहिजे त्याची उभारणी कशी करावी व त्याचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उमेश पाटील यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व, नैसर्गिक शेती घटकांचे उत्पादन तंत्रज्ञाणाने पिकातील उत्पादन खर्च्यात कशी बचत होईल तसेच विविध पिकात या घटकांच्या शास्त्रीय वापर कसा करावा व रसायनाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने कीड व रोगाचे व्यवस्थापन कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर नैसर्गिक शेतीचे उत्पादक गणेश पाटील यांनी आपल्या अनुभवाची नैसर्गिक शेती कशी फायद्याची आहे व त्याची विक्री व्यवस्था कशी असली पाहिजे याचे उदाहरणासह महत्व पटवून दिले याप्रसंगी उपस्तित प्रशिक्षनारथीना त्याचे प्रयोग बघण्यासाठी आव्हानही केले. दीपक पटेल यांनी आपल्या मार्गदर्शनात आत्मा अंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा केंद्राची रचना कशी असावी व ती कशा पद्धतीने कार्यरत राहील जेणेकरून स्थानिक स्तरावर निविष्ठा प्राप्त होतील व उत्पादन खर्चातही बचत होईल तसेच रसायनमुक्त निविष्ठाच्या वापर शेतीमध्ये कशा पद्धतीने करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर दुपारच्या सत्रात बीआरसी कशी असावी यावर प्रत्यक्षात नैसर्गिक शेतीच्या घटकांचे उत्पादन व जैविक निविष्ठा कशा पद्धतीने तयार कराव्यात यावर प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थ्यांनी प्रात्यक्षिके केलीत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण चव्हाण यांनी केले.



