*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात,तब्बल 26 लाख 800 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात,तब्बल 26 लाख 800 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
*अवैधपणे दारुची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात,तब्बल 26 लाख 800 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 7 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नवापुर पोलीस ठाणे हद्दीत कोळदा -धनराट रोडवरुन बोलेरो गाडी क्रमांक MH 06 BW 4454 हिच्यात रॉयल ब्लु दारुची अवैधरित्या चोरटी वाहतूक होणार आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील यांनी पथकास सदर बातमीची खात्री करुन कारवाई कामी रवाना केले,
मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे स्था.गु.शा. पथक पंचासह नवापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा-धनराट रोडवर सुळी फाट्याजवळ येऊन सापळा रचुन थांबले असता एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी ही कोळदा गावाकडून पथकाचे दिशेने येत असतांना दिसले, सदर वाहनास हाताचा इशारा देऊन थांबविण्यात आले. मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे वाहनाचा क्रमांक MH 06 BW 4454 असा होता. वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शिवाजी बाबूलाल चौधरी, वय 29 वर्षे, रा. बेटावद, ता. शिंदखेडा जि.धुळे असे सांगितले. त्यास वाहनात काय आहे बाबत विचारता भाताचे सालच्या गोण्या असल्याची माहिती घाबरलेल्या स्थितीत दिली. त्यावरुन पथकास त्याचेवर अधिकचा संशय बळावल्याने पथकाने सदर वाहनास चेक केले असता त्यामध्ये एकूण 26 लाख 00,800 रुपये किमतीची रॉयल ब्लू नामक दारुचे एकूण 198 खोके असे वाहनासह जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन वर नमुद इसम याचेविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 464/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि- मुकेश पवार, पोहेकों/जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवण, नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.



