*टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेत देवरे विद्यालयाची दीक्षा पाटील जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेत देवरे विद्यालयाची दीक्षा पाटील जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी*
*टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेत देवरे विद्यालयाची दीक्षा पाटील जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत शालेय परीक्षा विभाग आयोजित इंग्रजी परीक्षेत आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यालयाचा निकाल 98% लागला असून कु.दीक्षा अनिल पाटील इ.6 वी हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक संपादन केला तसेच इ.5 वीची प्रांजल जितेंद्र पाटील हिने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण तर 39 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह, दहा विद्यार्थी द्वितीय श्रेणी सह उत्तीर्ण झाले. कु. दीक्षा पाटील व मार्गदर्शक शिक्षक वाय. डी. बागुल, डी. बी.भारती यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह विद्यापीठाकडून लवकरच प्राप्त होणार आहेत. उर्वरित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे. कु. दीक्षासह यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे व सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच सर्व ग्रामस्थ पंचक्रोशी तील पालक वर्गाकडून अभिनंदनासह कौतुक केले जात आहे.