*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार गुन्हा रजि. नं. भाग 5 अ 111/2026 कलम 304 (2) बी.एन. एस मधील आरोपीतास अटक करून माल हस्तगत करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार हद्दीत रेल्वे स्टेशन नंदुरबार दिनांक 3 मे 2026 यातील फिर्यादी नामे रेहान राजु खाटीक, वय 20 वर्ष, धा गरजकाम, राह. पाटीलगढी मल्हारपुरा चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव हे ट्रेन नं. 12656 अप नवजीवन एक्स. चे पुढील जनरल कोच मधून रेल्वे स्टेशन अमळनेर ते नंदुरबार असा प्रवासी करीत असताना प्रवासा दरम्यान सदर गाडीत गर्दी असल्याने दरवजात उभा राहून प्रवास करीत होते. प्रवासा दरम्यान सदर गाडी रेल्वे स्टेशन नंदुरबार येथे थांबली असता एक अनोळखी मुलगा, वय अं. 20 ते 22 वर्ष, गोरा रंगाचा सडपातळ बांध्याचा, अंगात पिंक डिजाईनचे फुलबाहीचे शर्ट व काळया रंगाची जिन्सपॅन्ट घातलेला संशईताने सदर गाडी सुरू होताच फिरा यांच्या हातात असलेला एक मोटोरोला 50 फुयजन कंपनीचा मोबाईल त्यात जिओ सिम नं. ९३५६८५७७५३ आयएमईआय कमांक ३५९८७९७६५२०९८७३, ३५९८७९७६५२०९८५१ किं. 27000 रु चा हाताला झटका मारून हातातून हिसकावून चोरून नेला बाबत फिर्याद वरून लोहमामर्ग पोलीस ठाणे नंदुरबार येथे गुन्हा रजि. नं. 111/2026 कलम 304 (2) भाज्या.सं. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला येउन सदर गुन्हयाचा तपास आम्ही स्वताह सपोनि / राहूल शेजवळ तपासकामी हाती घेतला. सदर गन्हयाची वरिष्ठाना माहिती देउन सदर गुन्हयाची गंभीरता ओळखुन फिर्यादी यांनी संशईताचा तोडक्या स्वरूपातील दिलेल्या वर्णना वरून आम्ही व स्टॉप रेपोस्टे नंदुरबार व रेल्वे सुरक्षा बल पोस्ट नंदुरबार असे संयुक्तरित्या तपासात गोपनीय माहितीव्दारे तपसाचचके रेल्वे स्टेशन नंदुरबार परिसारातून सैय्यद अयाने सैय्यद अली, वय 19 वर्ष, राह. 3620 रूम नं. 2 ग्रांउड फलोअर मोमानावाड, गोपीपुरा, सुरत सिटी, सुरत (गुजरात) यास सदर शिताफितीने सापळा रचून अटक करून त्याच्या जवळून सदर गुन्हयात चोरीस गेलेलो एक मोटोरोला 50 फुयजन कंपनीचा मोबाईल किं. 27000 रू हस्तगत करून नमूद आरोपीता गुन्हयात अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कोतुकास्पद कामगिरी पोलीस अधिक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड बंसत भोये यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अन्वेशन अधिकारी पोलीस सपोनि/राहूल शेजवळ, रेसुब निरीक्षक/बंसत रॉय, पोउनि/प्रदीप सोनवणे, पोहवा/113 प्रकाश गोसावी, पोहवा/494 रविंद्र पाटील, पोहवा/92 किरण बोरसे, पोना/604 जितेंद्र चौधरी, पोहवा103 राजेश घोराडे तसेच रेल्वे सुरक्षा बल पोस्ट नंदुरबार येथील उपनिरी/अमित यादव, हेकॉ प्रग्नेश मांगला, यांच्या सयुक्त पणे केलेली आहे.



