*वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न*
*वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-2 मे 2026, शनिवार रोजी वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे, जेष्ठ नेत्या राणीताई गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना वळवी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, अजय निकुंभे, कृष्णा समुद्रे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष नयन भिल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश गुलाले, जिल्हा प्रवक्ता सुनिल कोळी, नवापूर तालुकाध्यक्ष किरण समुद्रे, नवापूर तालुका युवा अध्यक्ष उमेश पवार, तळोदा तालुकाध्यक्ष विशाल समुद्रे, नंदुरबार तालुकाध्यक्ष चिंधा बापू पवार तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तळोदा तालुकाध्यक्ष विशाल समुद्रे यांनी केले. कार्यक्रमात पक्षाची भूमिका मांडताना जिल्हा प्रवक्ता सुनिल कोळी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वंचित, बहुजन आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीशी जोडून संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी जिल्हा व शहर कार्यकारिणीतील विविध पदांची जबाबदारी स्वीकारली. संपूर्ण मेळावा उत्साह, जोश आणि परिवर्तनाच्या निर्धाराने भरलेला होता.



