*मावली (जुनी) येथील मारुती मंदीराचा कळशारोहण सोहळा उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मावली (जुनी) येथील मारुती मंदीराचा कळशारोहण सोहळा उत्साहात*
*मावली (जुनी) येथील मारुती मंदीराचा कळशारोहण सोहळा उत्साहात*
मुखेड(प्रतिनिधी):-येथून जवळच आसलेल्या मावली (जुनी) ता. मुखेड जि. नांदेड येथील मारुती मंदिरात हनुमान मुर्तीस्थापना व कळशारोहण सोहळा आज दिनांक 3 मे रोजी श्री सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत उत्साहात संपन्न झाला आहे.
माऊली जुनी हे गाव मन्याड नदीच्या काठावर असून मन्याड नदीला 1983 ला जोरदार अतिवृष्टी होऊन नदीला महापूर आला आणि पूर्ण गावच उध्वस्त झाले त्यामुळे शासनाने सदरील गावचे पुनर्वसन केले आणि पूर्ण गाव पुनर्वसीत गावात स्थापीत झाले मात्र येथील ग्रामदैवत नवसाला पावना-या मारुतीरायाचे पुरातन मंदिर आजही त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे येथील गावकरी मंडळीने या मंदिराचे त्याच ठिकाणी नव्याने आकर्षक बांधकाम करुन त्याच जुण्या मुर्तीची पुन्रस्थापना केली आहे. यावेळी श्री सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मंदिरावर कळस चढविण्यात आला असून गावातील वेधशास्त्र संपन्न ब्राम्हण रविंद्र देशाई यांनी विधीवत पुजा केली मानकरी म्हणून रामराव माणिकराव देशमुख यांनी सपत्नीक पुजा केली. याप्रसंगी गावकरी मंडळीने सर्व बाईलेकींचा सन्मान केला यावेळी भाविकभक्त मोठ्या संखेने उपस्थीत होते.



