*लायन्स क्लब नंदुरबारने दत्तक घेतले निराधार, बेघर वृद्धाश्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लायन्स क्लब नंदुरबारने दत्तक घेतले निराधार, बेघर वृद्धाश्रम*
*लायन्स क्लब नंदुरबारने दत्तक घेतले निराधार, बेघर वृद्धाश्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नगरपालिकेकडून चालविणारा जाणारा बेघर, निराधार आधार वृद्धाश्रम लायन्स क्लब नंदुरबारने एक वर्षासाठी पूर्णपणे दत्तक घेतला असून यात राहणाऱ्या सर्व लोकांना क्लब कडून दोन्ही वेळेचे जेवण, चहा, नाश्ता तसेच आरोग्याच्या ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. लायन्स क्लब च्या या उपक्रमाचे कौतुक संपूर्ण शहरात केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्याचे लाडके विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष शिंदे, सचिव दिनेश वाडेकर, ट्रेझरर डॉ चेतन बच्छाव, प्रोजेक्ट चेअरमन अनिल पाटील, श्रीराम दाऊतखाने तसेच झोन चेअरमन सतीश चौधरी आणि क्लब मधील सर्व सदस्यांच्या सत्कार केला. याप्रसंगी प्रकल्प समन्वयक मानसि भापकर, नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, लायन्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्स क्लब नंदुरबारतर्फे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दुपारी आणि सायंकाळी दोन्ही वेळ सुद्धा अन्नदान हे केले जात असते, तसेच निम्स हॉस्पिटल या ठिकाणीही सायंकाळी अन्नदान केले जात असते. सदर उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागत असतो. शहरातील सर्व दानशूर व्यक्तींना लायन्स क्लब नंदुरबार आव्हान करीत आहे की आपणही या उपक्रमात सहभागी व्हावे. यासाठी आपण क्लब मधील अध्यक्ष, सचिव किंवा कोणत्याही सदस्याला कळवून आपला सहभाग नोंदवू शकता.



