*नंदुरबार येथील एकलव्य व जग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा 98.84% निकाल विज्ञान शाखेतील 187 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह व 123 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील एकलव्य व जग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा 98.84% निकाल विज्ञान शाखेतील 187 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह व 123 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण*
*नंदुरबार येथील एकलव्य व जग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा 98.84% निकाल विज्ञान शाखेतील 187 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह व 123 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय व जब नटावदकर कनिष्ठ विद्यालय नंदुरबार यांचा बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, एकलव्य विद्यालय व ज ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे, यात कनिष्ठ महाविद्यालयाचा 98.84% निकाल लागला असेल यात विज्ञान शाखेतील 187 विद्यार्थी विशेष प्रविण्यसह व 123 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन लेखनीय कामगिरी बजावली आहे, यात विज्ञान शाखेचा निकाल हा शंभर टक्के असून कला शाखेचा निकाल 97.34% आहे तर वाणिज्य शाखेचा निकाल हा 96.84% लागला आहे, यात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक सानिका सुनील पाटील हिला 93%, द्वितीय क्रमांक समर्थ अजित लांडगे 90.67%, तृतीय क्रमांक गौरव अरुण पाडवी 88.87%, कला शाखेत प्रथम क्रमांक अजित आट्या वसावे 77%, द्वितीय क्रमांक बनसिंग रेल्या वसावे 75%, तृतीय क्रमांक लक्ष्मी राजेश पाडवी 74.37%, वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मुस्कान रामगोपाल शर्मा 93.17%, द्वितीय क्रमांक पृथा रोनक शहा 90.67% व तृतीय क्रमांक धैर्य राजीव शहा 89.67% मिळवले असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावदकर, माजी प्राचार्य सुहासिनी नटावदकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी के मराठे, उपप्रचार्य डॉक्टर गिरीश पवार, पर्यवेक्षक टी एन पाडवी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.