*लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होत, कात्रीची अंजना पावरा झाली पोलिस उपनिरीक्षक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होत, कात्रीची अंजना पावरा झाली पोलिस उपनिरीक्षक*
*लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होत, कात्रीची अंजना पावरा झाली पोलिस उपनिरीक्षक*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील कात्री गावाची सुपुत्री तसेच आचपा (लटकुवा) गावाचे वनकर वेस्ता पावरा यांची सुन अंजना मनोज पावरा यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन, पोलीस उप निरीक्षक पदावर मजल मारली आहे.
अंजना मनोज पावरा यांची सन 2019 मध्ये मुंबई शहरात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती, अंजना पावरा यांनी नऊ महिन्याचे खडतर पोलीस प्रशिक्षण पूर्ण करुन मुंबई येथे कर्तव्य बजावत जिद्द व चिकाटीने महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचा अभ्यास केला, कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्य पार पाडत कठीण परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातून 352 वा रँक मिळवत अंजना पावरा यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल धडगाव तालुक्यातील जनसामान्यांसह आप्तेष्ट नातेवाईक यांनी कौतुकाचा वर्षांव केला आहे. तसेच दोहाण्या वेस्ता पावरा, वनकर वेस्ता पावरा, खारकीबाई वनकर पावरा, मानसिंग वेस्ता पावरा, सखाराम वेस्ता पावरा, मनोज वनकर पावरा, भरत दोहाण्या पावरा, रमेश दोहाण्या पावरा, विरसिंग मानसिंग पावरा, रघुनाथ लोटन पावरा आदींनी अंजना पावरा हिचे अभिनंदन केले आहे.



