*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
पाचल(प्रतिनिधी):-तालुक्यातील पांगरी गावामध्ये लक्ष्मण सोनू चौगुले या शेतकऱ्यांच्या शेळीच्या कळपावरती काल संध्याकाळी बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळी मारली. संध्याकाळी परतीच्या वेळेस ही घटना घडली. शेळ्यांचा कळप घरी आणताना कळपामध्ये बिबट्या शिरला व एका शेळीला पकडून बाजूच्या झुडपात घेवून गेला. भयभित झालेला शेळीचा कळप रानोमाळ होवून शेतकऱ्यांने उशीरा घरी नेला. लक्ष्मण सोनू चौगुले आणि त्यांचा मुलगा शोधासाठी गेल्या नंतर केलेल्या जागेवरून काही अंतरावर घनदाट जंगलात त्यांना ती मारलेली शेळी सापडली. परंतू बिबट्याने शेळी फस्त केली होती. त्यामूळे चौगूले यांचे पंधरा ते विस हजारांचे नुकसान झाले आहे. संबंधीत वन खात्याने या घटनेची नोंद घेवून लक्ष्मण चौगूले (पांगरी) यांना नुकसान भरपाई करावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पो. पाटील सयाजी जाधव व सरपंच अमर जाधव यांनी केली गेली आहे.



