*वडदहसोळ येथील साई मित्र मंडळाच्या 29 व्या. वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडदहसोळ येथील साई मित्र मंडळाच्या 29 व्या. वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन*
*वडदहसोळ येथील साई मित्र मंडळाच्या 29 व्या. वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे वडदहसोळ मधील खालील वाडी येथील साई मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन सोहळा दि.13,14 व 15 मे या कालावधीत भव्य कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. दि.13 रोजी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 10000 भव्य द्राफी, द्वितीय 8000 भव्य द्राफी देऊन सन्मानित करण्यात येईल दि. 14 मे रोजी स.8 ते सायं 6 वाजेपर्यंत स्वराभिषेक संगीत भजन स्पर्धा होणार आहे सदर स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु 12000, रु 8000 आणि रु 5000 बक्षिसे तसेच उत्कृष्ट मृदंग/तबला वादक/चकवा वादक यांचाही वैयक्तिक गौरव करण्यात येणार आहे. तसेच दि.15 मे रोजी स.5.30 वा काकड आरती, स. 9 वा. श्री सत्यनारायण महापूजा, साईबाबा मूर्तीस दुग्धाभिषेक, स. 10 दिनदयाळ हाॅस्पिटल लांजा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर,स.11 हळदीकुंकू समारंभ,दु. 1 भव्य महाप्रसाद (भंडारा), दु. 3.30 साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक, रात्री 8 वा महाप्रसाद, रात्री 9 वा बक्षीस वितरण आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि रात्री 10 वा. जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ, रावारी (ता.लांजा) यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे कबड्डी आणि संगीत स्पर्धेसाठी प्रवेश फी भरुन आपला सहभाग निश्चित करावा अधिक माहितीसाठी संदीप नमसले (मुंबई) -७२०८३२१३२४, प्रदीप पळसमकर - ८३५६०५९८२६, शांताराम नमसले - ८४३३५९५७०२, देऊ जोगळे - ७९७२७०९४९७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन साई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



