*जैतापूर मधील न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ.राजश्री राजगौडा नारे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जैतापूर मधील न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ.राजश्री राजगौडा नारे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित*
*जैतापूर मधील न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ.राजश्री राजगौडा नारे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित*
राजापूर(प्रतिनिधी):-जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूरच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका सौ राजश्री राजगौडा नारे यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ रत्नागिरी यांच्या वतीने सौ. नारे यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल यंदाचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुप्षगुच्छ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या शानदार सोहळ्याला त्यांचे पती निवृत्त शिक्षक राजगौडा नारे जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुरेश पोवार आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अयुब मुल्ला अध्यक्ष जिल्हा मुख्याध्यापक संघ रत्नागिरी, महेश पाटकर सचिव, संदेश राऊत, रमेश तरवडेकर सदस्य राज्य महामंडळ होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामंत, विलास पाटील माजी प्राचार्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, गणपती कमळकर सहाय्यक उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर होते. जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक सल्लागार मंडळ अध्यक्ष दिवाकर आडविरकर यांनी संस्था, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सौ.नारे यांचे अभिनंदन केले.



