*आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू*
*आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन करणे, त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेला चालना देऊन क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा आहे.
विशेषतः “Tribal Sports Foundation” हा उपक्रम खेळाडूंसाठी समर्पित असून, गिर्यारोहक अनिल वसावे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. या माध्यमातून भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात किंवा क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी अनिल वसावे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एक अनुभवी गिर्यारोहक म्हणून त्यांनी आतापर्यंत किलीमांजारो, माऊंट एल्ब्रुस, सतोपंथ, माऊंट कियाग्री आणि माऊंट स्पांगनागरी यांसारख्या उंच शिखरांवर यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत. सध्या ते नेपाळमध्ये असून, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच शिखर Mount Everest 5364 फुट) या बेस कॅम्पवर तिरंगा फडकावत हा संकल्प त्यांनी केला आहे.