*घुणकीत गौतम बुद्धांची 2588 वी जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घुणकीत गौतम बुद्धांची 2588 वी जयंती साजरी*
*घुणकीत गौतम बुद्धांची 2588 वी जयंती साजरी*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-घुणकी येथील सिद्धार्थ नगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्यावतीने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2588 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या हस्ते गौतम बुद्धांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव यांच्या हस्ते प्रतिमेच्या समोरचे दीपप्रज्वलन करण्यात आले.
देशभरात 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन तसेच गौतम बुद्ध यांच्या 2588 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. या तिन्ही महत्त्वपूर्ण दिवसांच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, समता आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला.
शंकरराव पुढे म्हणाले की, आज देशात युद्ध होत आहेत तर सर्वच देशाला आता युद्धाची गरज नसून बुद्धांची विचाराची गरज आहे. यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव यांनी दीपप्रज्वलन केले व वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, महात्मा फुले सूतगिरणीचे जनसंपर्क अधिकारी रमेश पाटोळे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सचिन कांबळे, उपअध्यक्ष महेंद्र कांबळे, सचिव गौतम कांबळे, सुभाष कांबळे, विकास कांबळे, अजित पाटोळे, बबन पाटोळे पदाधिकारी उपस्थित होते.



