*शहादा येथे जनगणना प्रगणकांची मागणी Android 12 मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथे जनगणना प्रगणकांची मागणी Android 12 मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी*
*शहादा येथे जनगणना प्रगणकांची मागणी Android 12 मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय जनगणना 2026 अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार संभाजी पाटील यांच्याकडे अत्यावश्यक मागणीचे निवेदन सादर केले आहे. जनगणना कामासाठी किमान Android 12 व 4GB RAM असलेला मोबाईल आवश्यक असल्याने अनेक प्रगणक अडचणीत सापडले आहेत.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पंचायत समिती शहादा येथे दि. 28 एप्रिल 2026 ते 30 मे 2026 या कालावधीत प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जनगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून त्यासाठी अद्ययावत स्मार्टफोन आवश्यक आहे.
मात्र, अनेक प्रगणकांकडे Android 12 किंवा त्यापुढील व्हर्जनचा मोबाईल उपलब्ध नसून नवीन मोबाईल खरेदीसाठी सुमारे 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम सर्वांसाठी परवडणारी नसल्याने प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रगणकांनी दिलेल्या निवेदनात, शासन स्तरावरून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास जनगणना काम सुरळीत व वेळेत पूर्ण होईल, असे नमूद केले आहे. अन्यथा कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी किरण शिरसाठ, अनुप गोसावी, दिपक निकुंभ, शत्रुघ्न माळी, युवराज पाटील, हंसराज पाटील, महेंद्र चौधरी, गोपाल गावीत, उमेश विसपुते आणि विकास कांबळे आदी प्रगणकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.
दरम्यान, प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



