*कळसवलीची ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याला उत्साहात सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवलीची ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याला उत्साहात सुरुवात*
*कळसवलीची ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याला उत्साहात सुरुवात*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कळसवली गावची ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याला सुरुवात झाली असून शनिवार दि 2 मे 2026 रोजी सायं 5 ते 6 या वेळेत कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे रविवार 3 रोजी स.8.30 वा.पासून कलश पूजन सुरू दु. 11.45 वाजता प.पूज्य उल्हासगिरी महाराज - मठाधिपती गगनगिरी महाराज आश्रम कोंडिवळे ओणी यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. दु.1.30 वा महाप्रसाद, रात्री ८
8 ते 9 पालखी नृत्य आणि रात्री 10 वाजता बुवा सुशांत दिलीप जोईल महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवण देवगड विरुद्ध बुवा सुरज खांडेकर आई जांभईदेवी प्रासादिक भजन मंडळ पोंभुर्ले देऊळवाडी यांच्या भजनाचा जंगी सामना रंगणार आहे
सोमवार 4 मे रोजी स.10वा. सत्यनारायण महापूजा, दु.12.30 आरती व तीर्थप्रसाद, दु. 1.30 महाप्रसाद, दु. 3 वा हळदीकुंकू, रात्री 8 ते 9 पालखी नृत्य, रात्री 9 सत्कार समारंभ आणि रात्री 10 वाजता कोकण रत्न नाट्य नमन मंडळ मुंबई.ता. लांजा जि. रत्नागिरी यांच्या लोकप्रिय बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रमाला ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सुरेश तुकाराम शेडेकर (अध्यक्ष), कमलाकर शंकर पाटील - (गावप्रमुख), गणपत गोविंद शेडेकर, कृष्णा दादू शेडेकर, सुरेश जानू तळेकर (गावकर) आणि सर्व मानकरी, गावकरी कळसवली यांनी केले आहे.



