*बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदिवासी समाज हा मूळ हिंदूच-डॉ. विशाल वळवी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत संयोजक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदिवासी समाज हा मूळ हिंदूच-डॉ. विशाल वळवी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत संयोजक*
*बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदिवासी समाज हा मूळ हिंदूच-डॉ. विशाल वळवी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत संयोजक*
तळोदा(प्रतिनिधी):-बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारोंच्या संख्येने उपस्थिती नोंदविण्यात आली.
या सभेमध्ये मान्यवर वक्ते प्रशांत जुवेकर यांनी हिंदू धर्मावर होत असलेल्या विविध आघातांविषयी मार्गदर्शन केले. 100 कोटी हिंदूंचे स्वतःचे जगात एकही हिंदु राष्ट्र नसून संविधानिक मार्गाने हिंदु राष्ट्र स्थापन होणे ही काळाची गरज आहे. धर्मांध लोकं लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर अशा विविध जिहाद करून हिंदूंना संपवून ह्या देशाला इस्लामिक राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंदु जात, पक्ष, संप्रदाय सर्व बाजुला ठेऊन एक हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपल्या राष्ट्रपुरुष महापुरुषांनी घरा दारावर तुळशीपत्र ठेवले तेव्हा हिंदवी स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळू शकले त्यामुळे हिंदु राष्ट्र सहज येणार नाही तर त्यासाठी आपल्या सर्व हिंदूंना जागृत करावे लागणार असे आवाहन करत संघटन शक्तीचे महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून स्पष्ट केले. तसेच, हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखेच्या कु.सायली पाटील यांनी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी दिवसेंदिवस वाढत असलेल्या लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महिलांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली आणि आत्मबळ वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक डॉ. विशाल वळवी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासी हे मूळ हिंदूच असल्याचे सांगत काही संघटनांकडून आदिवासी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याची खंत व्यक्त केली. त्यांना हिंदु समाजापासून आदिवासी बांधवांना दूर करण्यासाठी खूप मोठे षडयंत्र रचण्यात येत असून आदिवासी बांधवांनी एकसंघ राहून आपल्या संस्कृती व धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सभेची सुरुवात आई देव मोगरा माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश बागुल यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी बोरद गावातील सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.



