*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):- नंदुरबार येथील नं.ए.सो. संचलित श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल मधील मुख्याध्यापक/प्राचार्य मोहन अहिरराव हे शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी त्यांना भावपूर्ण निरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ, प्रमुख अतिथी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, अध्यक्ष राहुल पाठक, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव प्रशांत पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे व हेमंत खैरनार तसेच संस्थेतील सर्व शाखेतील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक मोहन अहिरराव यांनी सांगितले की मुख्याध्यापक असतांना सर्वांना सोबत घेऊन प्रशासन सांभाळायचे असते, आपल्या कामात आपण एकनिष्ठ असावे हे त्यांनी स्पष्ट केले, नेहमी आपण सकारात्मक विचारसरणी ठेवावी. तसेच माझ्या यशाच्या वाट्यात माझ्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे हे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नरेंद्र सराफ यांनी अहिराव यांनी सांभाळलेल्या प्रशासनाबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षक मनोगतातून डी आर हायस्कूल चे पर्यवेक्षक हेमंत खैरनार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक शांताराम पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आशिष सोनार यांनी अहिराव यांच्या आठवणींना व शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनेक अनुभव विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम परदेशी, प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, मानपत्र वाचन सारंग बुवा, तर आभार संस्थेचे सचिव प्रशांत पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



