*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा गंभीर चलन तुटवडा दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पावले उचलली आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी या संदर्भात आरबीआयला पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
त्यांच्या पत्राची दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यात लवकरच नवीन नोटांचा पुरवठा केला जाईल, असे लेखी उत्तर दिले आहे. जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यासोबतच शेतकरी आणि व्यापाऱ्यांची रोख रकमेची निकड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही बाब खा. अशोक चव्हाण यांनी 26 एप्रिल रोजी पत्राद्वारे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली होती.
या पत्राला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेचे नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक धीरज रामटेके यांनी रोख रकमेच्या स्थितीवर बँक बारकाईने लक्ष ठेवून सांगत नांदेड जिल्ह्यातील करन्सी चेस्टला नवीन नोटांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कळवले आहे. रोख रकमेची गरज वेळेत पूर्ण करण्यासाठी बँक अधिकारी सातत्याने समन्वय साधून आहेत. पुरेशा चलनाची गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध असून, या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचेही बँकेने पत्रात नमूद केले आहे. खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच जिल्ह्याला पुरेशा चलनाचा पुरवठा अपेक्षित असून, त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल.



