*दुर्गम भागातील प्रश्नांवर अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुर्गम भागातील प्रश्नांवर अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष*
*दुर्गम भागातील प्रश्नांवर अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे भेट घेतली. त्यावेळी दुर्गम भागातील विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रश्न त्यांनी मांडले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले.
अक्कलकुवा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष नितेश वळवी, महेश तवर, उमेश पाडवी, अमृत चौधरी, जगदीश वसावे, सुधीर पाडवी आणि अन्य या प्रसंगी उपस्थित होते. माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या विविध विकासकामातील अडचणी, अक्कलकुवा भागातील दुर्लक्षित केले जाणारे विकासकाम, प्रशासनातील अडथळे याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी लक्ष वेधले. दुर्गम भागातील जनतेशी संबंधित हे सर्व प्रश्न तातडीने सोडवले जातील तसेच निधी प्राप्त होण्याच्या मार्गातील अडथळे व विकास कामातील अडथळे लवकरच दूर केल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले.