*समता युवा मंच वतीने प्रबोधनात्मक भीम गीत गायनासह समता भूषण तथा समतारत्न पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समता युवा मंच वतीने प्रबोधनात्मक भीम गीत गायनासह समता भूषण तथा समतारत्न पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न*
*समता युवा मंच वतीने प्रबोधनात्मक भीम गीत गायनासह समता भूषण तथा समतारत्न पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कोरिट नाका परिसर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळा निमित्त महाराष्ट्राचे प्लेबॅक सिंगर रॉकस्टार राहुल साठे यांच्या प्रबोधनात्मक भीम गीत गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष उद्घाटक म्हणून लाभल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे हे लाभले, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, नवापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश देसले, महेंद्र नगराळे, नगरसेवक मनोहर नगराळे, राऊ मोरे, प्रवीण गुरव, कुणाल वसावे, रवींद्र पवार, वंदना साळुंके, वतन अग्रवाल, भरत लोहार, कुणाल वसावे, भरत चौधरी, मुन्नाभाई पटेल, जय रघुवंशी, चेतन वळवी, भूषण नेरे, हिरालाल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते व, कार्यक्रमाच्या उद्घाटक रत्ना रघुवंशी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या हस्ते विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान विविध सामाजिक, आरोग्य, राजकीय, पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, चळवळ, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय समतारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी राजकीय क्षेत्रात नवापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, सामाजिक क्षेत्रात सचिन पावरा शहादा, साहित्य क्षेत्रात संतोष पावरा लक्कडकोट, शहादा, पत्रकारिता क्षेत्रात विशाल मोहन माळी नंदुरबार, उत्तम प्रशासकीय अधिकारी स्नेहल अवसरमल तळोदा, कला, अभिनय क्षेत्रात विजय दगडू पवार नंदुरबार, यांना नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नंदुरबार शहराच्या सर्वांगीण विकास विकासासाठी मागील पंधरा वर्षापासून सातत्याने कार्य करणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेच्या लोकप्रिय कार्यसम्राट लोकनियुक्त नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समता भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचवेळी नवापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्या समता युवा मंच तथा समाज बांधवांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या नॅशनल तेंग सुडो स्पोर्ट्स कोरियन कराटे या स्पर्धेत विजयी मिळवल्याबद्दल या खेळाडूंना ऊतकृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आले. यशस्वी खेळाडू आशिऀता योसेफ वळवी,
अक्षदा दिनेश बैसाणे, सिद्धी अंबालाल पटेल,
रुचिता प्रवीण पाटील, खुशराज अनिल सोनवणे, निखिल विनोद पाटील, रजी़न अमीन बेग मिर्झा,
जै़न अतिक, अहमद शेख
कार्यक्रमाचे आयोजन समता युवा मंचचे राम साळुंके, सुभाष पानपाटील, एड. प्रवीण वाघ, बिरजू म्हस्के, समिती अध्यक्ष रुपेश बत्तीसे, उपाध्यक्ष गौतम पानपाटील, कार्याध्यक्ष जवाहर पवार, खजिनदार मुकेश पगारे,
सल्लागार महेंद्र बाविस्कर, सचिन पिंपळे, विवेक शिरसाठ, नरेंद्र बाविस्कर, राहुल रामराजे, मंगलदास पानपाटील, जितेंद्र पानपाटील, श्याम साळुंके, डॉक्टर दिनेश बैसाणे, सुलतान पिंजारी, किरण खोकले, रितेश मोरे, सनी फाळके, मुकेश गुरव, नितीन, दामोदर, कुणाल, सिद्धार्थ साळुंके, सौरभ साळुंखे, कुणाल आगळे, एडवोकेट प्रेमानंद इंद्रजीत, मनीष बिरारे, वीरेन गुरव, आशिष रामराजे, पुष्कर आगळे, गौरव रघुवंशी, आदींनी केले राहुल साठे यांच्या प्रबोधनात्मक भीम गीत गायनामुळे हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन रोशनी शिरसाट बाविस्कर यांनी केले.



