*24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, विसरवाडी हद्दीतील घटना,आरोपीकडू 62,000 रुपये किमतीचा सोन्याचांदीचा मुद्देमाल सह रोख रक्कम हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, विसरवाडी हद्दीतील घटना,आरोपीकडू 62,000 रुपये किमतीचा सोन्याचांदीचा मुद्देमाल सह रोख रक्कम हस्तगत*
*24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, विसरवाडी हद्दीतील घटना,आरोपीकडू 62,000 रुपये किमतीचा सोन्याचांदीचा मुद्देमाल सह रोख रक्कम हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-24 एप्रिल 2026 रोजी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी सरलाबाई गावीत, रा. खडकी, ता. नवापूर जि. नंदुरबार यांचेकडील सोनेचांदीचे दागिने अज्ञात चोरटयानी फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले म्हणून गु.र.नं. 173/2026 भा.न्या. संहिता कलम 305 (अ), 331 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा खडकीपाडा येथील राहणारा अमित भामटया गावीत याने केला असुन तो चोरी केलेले दागिने विकण्यासाठी विसरवाडी येथील नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास सदर इसमाचा शोध घेणेकामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर इसमाचा विसरवाडी येथील नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे पुलाखाली जाऊन शोध घेता तेथे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले, त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमित भामट्या गावीत, त्रय- 20 वर्षे, रा. खडकीपाडा, पोस्ट खडकी, ता. नवापुर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास नमुद गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली देत पंचासमक्ष त्याचे अंगझडतीत त्याचेकडून एकूण 53,500 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व 8,500 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याअन्वये विसरवाडी पोलीस ठाणे येथील गु.र.नं. 173/2026 हा गुन्हा 24 तासांचे आत उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर गुन्हयाचा तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी जयेश खलाणे यांच्याकडुन सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा. पोउपनि राकेश वसावे, तसेच पोहेको दिनेश चित्ते, दिपक वारुळे, पोशि/अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.



