*बुद्ध भीम महोत्सव समितीच्या वतीने बुद्ध पहाट चे 30 एप्रिल रोजी आयोजन, नागपूरच्या जाधव सिस्टर्स यांच्या सुरेल संगीताची नांदेडकरांना मेजवानी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बुद्ध भीम महोत्सव समितीच्या वतीने बुद्ध पहाट चे 30 एप्रिल रोजी आयोजन, नागपूरच्या जाधव सिस्टर्स यांच्या सुरेल संगीताची नांदेडकरांना मेजवानी*
*बुद्ध भीम महोत्सव समितीच्या वतीने बुद्ध पहाट चे 30 एप्रिल रोजी आयोजन, नागपूरच्या जाधव सिस्टर्स यांच्या सुरेल संगीताची नांदेडकरांना मेजवानी*
नांदेड(प्रतिनिधी):-तथागतांच्या धम्माचे चक्र गतिमान करण्यासाठी भगवान बुद्धांच्या 2589 व्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम महोत्सव समिती नांदेडच्या वतीने याही वर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे नागपूर येथील सुप्रसिद्ध जाधव सिस्टर्स यांच्या सुरेल बुद्ध भीम गीतांची नांदेडकरांना मेजवानी मिळणार आहे. तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 17 वर्षापासून बुद्ध - भीम महोत्सव समितीच्या वतीने बुद्ध पहाटचे आयोजन करण्यात येते. नांदेडमध्ये बुद्ध पहाटची सुरुवात करणाऱ्या बुद्ध भीम महोत्सव समितीने गेल्या 17 वर्षात देशातील अनेक नामवंत गायकांच्या संगीतमय बुद्ध गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून बुद्ध पहाटचे यशस्वी नियोजन केले होते. बुद्ध पहाटचे हे 17 वे वर्षे असून यावर्षी गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी मिलिंद जाधव नागपूर प्रस्तुत जाधव सिस्टर्स बुद्ध भीम गीतांचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी श्रीलंका आणि छत्रपती संभाजी नगर येथील भिक्खू संघाची धम्मदेशना व पूजापाठ आयोजित केली आहे. बुद्ध पहाट या संगीतमय ऐतिहासिक कार्यक्रमास बौद्ध बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.