*सन 2026 खरीप हंगाम पूर्व तयारी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सन 2026 खरीप हंगाम पूर्व तयारी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न*
*सन 2026 खरीप हंगाम पूर्व तयारी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मित्तली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली व नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या सहअध्यक्षतेखाली तसेच शंकर किरवे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, किशोर हडपे कृषी विकास अधिकारी, सचिन देवरे मोहीम अधिकारी, स्वप्नील शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. सदर सभेस एमएआयडीसी प्रतिनिधी, एमसिडिसी प्रतिनिधी, मार्केटिंग फेडरेशन प्रतिनिधी, खत कंपनी प्रतिनिधी, बियाणे कंपनी प्रतिनिधी, खते /बियाणे/ कीटकनाशक विक्रेते प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभेचे सादरीकरण कृषी विकास अधिकारी यांनी केले. सदर सादरीकरणात जिल्ह्यातील सन 2025-26 खरीप/ रब्बी मधील झालेल्या कार्यवाहीचा अहवाल व सन 2026 -27 खरीप हंगामाचे खत /बियाणे यांचे नियोजनबाबत आढावा सादर केला. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये युरिया या खताला पर्याय नॅनो युरियाचा वापर वाढवण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे पिकांवर फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचार प्रसिद्धी देण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पीक पेरणी क्षेत्र व पिकांच्या गरजेनुसार खत पुरवठा होईल अशी दक्षता घेण्याच्या सूचना सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांना दिल्या.



