*सिटु संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना प्रकल्प कमिटी नंदुरबार यांचे चर्चासत्र*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिटु संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना प्रकल्प कमिटी नंदुरबार यांचे चर्चासत्र*
*सिटु संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना प्रकल्प कमिटी नंदुरबार यांचे चर्चासत्र*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सिटु संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना प्रकल्प कमिटी नंदुरबार यांचे मार्फत आयोजित केलेल्या कर्मचारी व प्रकल्प कार्यालय प्रशासन यांच्या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली सदर कार्यक्रम धुळे व नंदुरबार जिल्हा आश्रमिय कर्मचारी पतसंस्था नंदुरबार यांच्या दालनात आयोजित करण्यात आला होता. चर्चेमध्ये नंदुरबार प्रकल्प कमिटीचे उपाध्यक्ष व राज्य कमिटी सदस्य नारायण गिरासे यांनी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मांडले या प्रश्नांवर नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, शिक्षण विस्ताराधिकारी डी एच माळी, विजय सोनार यांनी सदर प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमाला नंदुरबार प्रकल्प कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष नारायण गिरासे, विशाल गावित, कांचन गावित, संघटनेच्या ज्येष्ठ व जुन्या संघटक श्रीमती एस एन नाईक, कमिटी सदस्य गुलाब राणा व कमिटी सदस्य रवींद्र सावंत हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी पतसंस्थेचे चेअरमन आर आर पाटील व पतसंस्थेचे सर्व सहकारी कर्मचारी बांधवांचे आभार मानण्यात आले.