*मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न; योग्य दखल घेणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न; योग्य दखल घेणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन*
*मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न; योग्य दखल घेणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे नंदुरबार येथील भाजपा नगरसेवकांनी डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी शहरातील विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रश्न त्यांनी मांडले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले.
नंदुरबार नगरपालिकेतील विरोधी गटनेता हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, चारुदत्त कळवणकर, लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, एडवोकेट प्रकाश भोई, सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे, ओम प्रकाश अग्रवाल आणि अन्य उपस्थित होते. माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर करून दिलेल्या शहरातील विविध समाज संघटनांच्या सामाजिक भवन उभारणीतील अडथळे तसेच शहरातील विविध प्रश्न याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी लक्ष वेधले. नंदुरबार शहरातील जनतेशी संबंधित हे सर्व प्रश्न तातडीने सोडवले जातील तसेच निधी प्राप्त होण्याच्या मार्गातील अडथळे व विकास कामातील अडथळे लवकरच दूर केले जातील असे त्यांनी आश्वासन दिले.