*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-राजापूर-लांजा- साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या नावाने "आमदार चषक 2026" पर्व दुसरेचे आयोजन दादा येडगे मित्र मंडळाचे वतीने मुंबईतील अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या भव्य मैदानात 25 एप्रिल व २६ एप्रिल 2026 रोजी करण्यात आले आहे. यात एकूण 32 संघाचा सहभाग असेल तसेच प्रथम विजेत्या संघास रोख रक्कम रु. 51000 सह भव्य आमदार चषक प्रदान करण्यात येईल. व द्वितीय संघास रोख रक्कम रु.21000 सह चषक प्रदान करण्यात येईल यासाठी गेले अनेक जोरदार तयारी होताना दिसून येतेय. सध्या संपूर्ण देशात क्रिकेटचा फिवर शिगेला असताना सर्वाधिक तरूणाई या खेळाकडे आकर्षित झालेली दिसून येते. त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये आयोजन असलेल्या आमदार चषकाकडे सर्वांच्या विशेष नजर आहेत.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलेले दादा येडगे आणि त्यांच्या सोबतीने संयोजक म्हणून राम जांगळे, तानाजी शेळके, राजू वरक, सुरेश बावदाणे, दशरथ जांगळे, संतोष बावदाणे, सूर्यकांत जांगळे, संदेश झोरे, प्रदीप झोरे, शांताराम शेळके, सुनिल झोरे आदि मंडळी विशेष मेहनत घेत आहेत. सोबतीने मार्गदर्शक म्हणून गणेश आडिवरेकर, प्रवीण कानडे, आदिनाथ कपाळे, जितेंद्र तुळसवडेकर , अमित साळवी, योगेश चव्हाण, प्रसाद गुरव, विहांग खानविलकर, प्रल्हाद नारकर, महेश नकाशे, प्रज्योत खडपे, सुरेंद्र सौंदाळकर,गणेश पाष्टे, राजेश झोरे, अजिंक्य चिले, गौरव सौरप, मंदार राजये, मंदार गीतये, अजिंक्य चिले, विनायक चव्हाण, अजय खानविलकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सदर स्पर्धेला अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहत सहकार्य करावे अशी विनंती आयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आली आहे.



