*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
टिटवाळा(प्रतिनिधी):-गेली 12 वर्ष निस्वार्थ सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार राजेंद्र मधुकर सावंत. यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून प्रथमच टिटवाळा हरी ओम व्हॅली सोसायटीत दिनांक. 19 एप्रिल 2026 रोजी "महामानवाला करू सलाम" राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. हे काव्य संमेलन राजेंद्र सावंत यांनी स्वखर्च करून महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्रीना सहभागी करून घेतले होते. आज तरुण वर्गात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. देशाच्या स्वतंत्रासाठी ज्या महापुरुषांनी आंदोलन केले, न्याय हक्कासाठी लढा दिला त्यांना आजची पिढी विसरत चालली आहे. आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा फक्त जयंती सोहळा म्हणून साजरा केला जातो पण बाबासाहेबांचे विचार, शिकवणी कुणीही आत्मसाद करीत नाही. म्हणून टिटवाळा शहरात वास्तव्यात असलेले. सामाजिक व कला क्षेत्रात वावरणारे श्री राजेंद्र सावंत ह्यांनी टिटवाळा येथे काव्य संमेलनाची संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांची देवाण घेवाण करण्याचे मोठे कार्य राजेंद्र सावंत यांनी केले. आज महाराष्ट्र राज्यात मोठ मोठे कविता स्पर्धा, काव्य संमेलन होतात परंतु टिटवाळा शहरात अशी संकल्पना कुणीच राबविली नाही. राजेंद्र सावंत यांचे कृतिशील सामाजिक कार्य आहे. सकारात्मक विचाराने कार्य करण्यात त्याचा हातखंडा आहे.
या काव्य संमेलनात कोणतेही पाठबळ नाही की सहकार्य नाही स्वतःचे कुटुंब त्यांच्या पाठी ठाम उभे राहिल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 135 वी जयंतीचे औचित्य साधून टिटवाळा (,पूर्व), हरी ओम व्हॅली सोसायटीत मोठ्या जल्लोषात काव्य संमेलन संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यातून नागपूर, चाळीसगाव, पुणे, नाशिक, शहापूर, ठाणे, कल्याण, मुंबई कोल्हापूर इत्यादी भागातून 45 कवींनी सहभाग घेऊन काव्य रचना आपल्या शैलीत सादर केल्या. सर्व कवींना गौरव सन्मानत्र देऊन सन्मान करण्यात आला. या काव्य सोहळ्याचे उद्घाटक दीपक घाणेकर होते, तसेच काव्य संमेलनाला दिग्गज मान्यवर लाभले होते. अध्यक्ष ख. र. माळवे होते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार विलास देवळेकर, कोकणस्य ज्येष्ठ साहित्यिक मनमोहन रोगे होते. ठाणे येथील साहित्यिक, गीतकार ऍडव्होकेट रुपेश पवार हे संयोजक होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, बौद्धचार्य, राष्ट्रपती पुरस्कृत ख. रा. माळवे होते. काव्य सोहळ्याला ज्येष्ठ कवी राजगुरू राजरत्न यांनी आपल्या शैलीत काव्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. हरी ओम व्हॅली मदर सोसायटीचे अध्यक्ष भरत खरे मंचावर उपस्थिती होती= राजेंद्र सावंत यांचे आयोजन कौतुकास्पद होते. उपस्थित सर्व कविवर्याना भोजन व्यवस्थाही त्यांनी केली होती. कोणतेही शुल्क किंवा मदत न घेता स्वबळावर राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करून समाजात समता, बंधुत्व टिकून ठेवण्याचे काम राजेंद्र सावंत यांनी केले आहे. आज टिटवाळा शहरात त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होतांना दिसून येत आहे.



